LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Share icon
Lyrics
वेदांनाही नाही कळला
वेदांनाही नाही कळला अंतपार याचा
कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा

निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रगटला उभा विटेवर
निराकार तो निर्गुण ईश्वर असा प्रगटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटीवर
उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा
कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा

परब्रम्ह हे भक्तासाठी
परब्रम्ह हे भक्तासाठी
मुके ठाकले भीमे काठी
मुके ठाकले भीमे काठी
उभा राहिला भाव सावयव जणु कि पुंडलिकाचा
कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा

हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो
हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा
पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा
कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा
कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा

WRITERS

AJIT PARAB, AMIT PADHYE, G.D. MADGULKAR

PUBLISHERS

Lyrics © Phonographic Digital Limited (PDL), Royalty Network

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other